तेज प्रताप यादव यांची राजदमधून हकालपट्टी   

पाटणा : बेजबाबदार वर्तन केल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांनी मुलगा तेज प्रताप यांची राष्ट्रीय जनता पक्षातून (राजद) रविवारी हकालपट्टी सहा वर्षांसाठी केली.लालू प्रसाद यादव पक्षाचे अध्यक्ष आहेत. तेज प्रताप यादव त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याची पोस्ट त्यांनी एक्सवर काल टाकली. सामाजिक न्यायासाठी व्यक्तीकडे नैतिक मूल्यांचे अधिष्ठान आवश्यक आहे. ते नसेल तर सार्वजनिक जीवनात काही एक अर्थ नाही. तेज प्रताप याचे वर्तन बेजबाबदार पणाचे असल्याचे आढळून आले. त्यामुळे  कारवाई केली. कुटुंबातील ज्येष्ठ मुलगा असूनही कौटुंबीक मुल्ये आणि परंपरेचे त्याने पालन केले नाही. या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर मी मुलाची पक्षातून हकालपट्टी करत आहे. पक्षामध्ये त्यांना आता कोणतेही महत्त्व नाही. त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करत असल्याचे यादव यांनी पोस्टमध्ये नमूद केले. 

Related Articles